Jio Prepaid Plan : जिओचा तगडा प्लॅन! मोफत OTT सबस्क्रिप्शन आणि दररोज 2.5GB डेटासह मिळतील अनेक फायदे

Jio Prepaid Plan : रिलायन्स जिओ ही देशातील इतर टेलिकॉम कंपन्यांना सतत कडवी टक्कर देत असते. कंपनीचे प्लॅन ग्राहकांच्या बजेटमध्ये येतात. त्यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओच्या ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे.

कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. दरम्यान, आता या कंपनीने आपले काही शानदार रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी आणले आहेत, ज्यात तुम्हाला मोफत OTT सबस्क्रिप्शन आणि दररोज 2.5GB डेटासह अनेक फायदे मिळतील. जाणून घ्या कंपनीचे रिचार्ज प्लॅन किंमत.

रिलायन्स जिओचा 3662 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

या 3662 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुमच्या ग्राहकांना 365 दिवसांची म्हणजेच १ वर्षापर्यंत वैधता मिळेल. यात तुम्हाला दररोज २.५ जीबी डेटाचा लाभ घेता येईल. म्हणजेच तुम्हाला एकूण 912.5 जीबी डेटा मिळेल. यात तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा आणि अनलिमिटेड 5G डेटा मिळेल. ज्यात तुम्हाला दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला SonyLiv, Zee5 आणि Jio TV, Jio Cinema चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. परंतु यामध्ये तुम्हाला Jio Premium चे सबस्क्रिप्शन मिळत नाही. ज्याचा तुम्हाला मनापासून आनंद घेता येईल.

रिलायन्स जिओचा 2999 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 2999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता 365 दिवस असून ज्यात तुम्हाला दररोज 2.5GB डेटा मिळेल. तसेच दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि 100 एसएमएस मिळेल. इतकेच नाही तर तुम्हाला Jio TV, Jio Cinema आणि Jio cloud वर मोफत प्रवेश मिळेल.

एअरटेल 839 रिचार्ज प्लॅन

यात तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळत असून जे दररोज 2GB डेटासह उपलब्ध असून यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळेल. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळत आहे. तुम्हाला Airtel Xstream प्लेची मजा मिळत आहे, तुम्ही याचा सहज लाभ घेता येईल.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts