Jio Recharge Plan : जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीच्या एका स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एक वर्षासाठी मोफत Amazon प्राइम व्हिडिओचा आनंद घेता येईल. तसेच यात इतर फायदे मिळत आहेत.
किमतीचा विचार केला तर रिलायन्स जिओच्या या प्लॅनची किंमत 3227 रुपये इJio Recharge Planतकी आहे, या जिओ प्लॅनमध्ये तुम्हाला किती डेटा मिळेल आणि हा प्लान किती दिवसांची वैधता आहे? जाणून घेऊयात या प्लॅनबद्दल सविस्तर माहिती.
रिलायन्स जिओचा 3227 रुपयांचा प्लॅन
3227 रुपयांचा हा प्लॅन घेतला तर तुम्हाला दररोज 2 GB हाय-स्पीड डेटाचा लाभ मिळत आहे, परंतु मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होऊ शकते. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा मिळेल. तुम्हाला 100 रुपये प्रतिदिन एसएमएसचा लाभ मिळेल.
त्याशिवाय तुम्हाला Reliance Jio चा हा Jio प्रीपेड प्लॅन 365 दिवसांच्या दीर्घ वैधतेसह मिळू शकतो. 365 दिवसांच्या वैधतेनुसार आणि दररोज 2 GB डेटा, या प्लॅनसह तुम्हाला एकूण 730 GB हाय-स्पीड डेटाचा लाभ मिळू शकतो.
एकंदरीतच या एका रिचार्जवर तुम्हाला वर्षभर रिचार्ज करावा लागणार नाही. याच्या इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर 3227 रुपयांच्या या प्लॅनसह, Reliance Jio तुम्हाला Amazon Prime Video Mobile Edition, Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud वर 1 वर्षासाठी मोफत प्रवेश मिळेल. समजा जर तुमच्या भागात Jio ची 5G सेवा असेल आणि तुमच्याकडे 5G फोन असेल तर तुम्ही या प्लॅनसह अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद घेता येईल.
लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी
हे लक्षात ठेवा की तुम्हाला कंपनीच्या अधिकृत साइटवर प्रीपेड वार्षिक योजना विभागात Jio 3227 प्लॅनची यादी मिळेल. तसेच प्लॅनसोबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio Cinema मिळू शकते. पण तुम्हाला Jio सिनेमाच्या प्रीमियम सब्सक्रिप्शनमध्ये प्रवेश मिळणार नाही.