Jio Recharge Plan : जिओचा अप्रतिम प्लॅन! मिळेल अनलिमिटेड कॉलिंग, 2.5 GB डेटा आणि बरंच काही

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ ही देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी शानदार रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होतो. एअरटेल आणि जिओमध्ये सतत टक्कर पाहायला मिळते.

सध्या जिओने असाच एक रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्याची किंमत ग्राहकांच्या बजेटमध्ये आहे शिवाय यात अनलिमिटेड कॉलिंग, 2.5 GB डेटा आणि बरंच काही दिले जात आहे. हा प्लॅन एअरटेलला टक्कर देतो. जाणून घेऊयात सविस्तर.

हा Airtel आणि Jio च्या प्रीपेड प्लॅन आहे. या दोन्हीच्या किमतीत फारच कमी फरक आहे, परंतु सुविधा बंपर उपलब्ध आहेत. तुम्हाला एअरटेल आणि जिओचा कोणता रिचार्ज प्लॅन उत्तम आहे हे तुम्हाला स्वतःला ठरवावे लागणार आहे. एअरटेलच्या प्लॅनची किंमत 359 रुपये आणि जिओ प्लॅनची किंमत 349 रुपये निश्चित केली आहे.

एअरटेलचा 359 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

देशातील बड्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये गणल्या जाणार्‍या एअरटेलचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे, ज्याची किंमत 359 रुपये ठेवली आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनीने सर्व उत्तम सुविधा उपलब्ध आहेत, ज्यात वापरकर्त्यांना दररोज 2 GB डेटा देण्यात येत आहे. तसेच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे.

कंपनीच्या प्रीपेड प्लॅनच्या वैधतेबद्दल सांगायचे तर ते 1 महिना म्हणजेच 30 दिवसांचे इतके आहे. यात दररोज 100 SMS ची सुविधा देखील देण्यात येत आहे. जर या प्लॅनचा दैनंदिन खर्च काढायचा झाला तर तो जवळपास 12 रुपये इतका असेल.

रिलायन्स जिओचा 349 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये गणल्या जाणार्‍या रिलायन्स जिओचा 349 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 30 दिवसांची म्हणजेच 1 महिन्याची वैधता देण्यात येते. एकूण या प्लॅनच्या डेटाबद्दल बोलायचे झाले तर 75 जीबी डेटा दिला जातो.

यात दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो. वापरकर्ते अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ देखील घेता येतो. त्यासोबत दररोज 100 एसएमएसची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. जर कंपनीच्या या प्लॅनच्या दैनंदिन खर्चाची गणना केली तर ती सुमारे 11 रुपये इतकी असेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts