Jio Recharge Plan : जिओचा धमाका! कमी किमतीत मिळतात जबरदस्त फायदे, Airtel-Vi चीही बत्ती गुल

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओकडे सर्वात जास्त ग्राहक आहेत. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्लॅन ऑफर करत असते. Jio, Airtel आणि Vodafone-Idea वापरकर्त्यांना 84 दिवस चालणाऱ्या उत्तम योजना देतात.

या प्लॅन्समध्ये तुम्हाला तीन महिन्यांसाठी डिस्ने हॉटस्टारचा मोफत प्रवेश मिळेल. या प्लॅन्समध्ये फ्री कॉलिंगची सुविधा देतात. यापैकी जिओ कमी किमतीत मजबूत फायदे ऑफर करतो. कंपनीने Airtel-Vi चीही बत्ती गुल केली आहे. पहा.

रिलायन्स जिओचा 808 रुपयांचा प्लॅन

किमतीचा विचार केला तर Jio च्या 84 दिवसांच्या प्लॅनची ​​किंमत Airtel आणि Vodafone-Idea पेक्षा खूप कमी आहे. यात तुम्हाला दररोज इंटरनेट वापरण्यासाठी 2 जीबी डेटा मिळेल. इतकेच नाही तर हा प्लॅन पात्र वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा देत आहे.

या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस मिळतात. वापरकर्त्यांना प्लॅनमध्ये, तीन महिन्यांसाठी डिस्ने हॉटस्टार मोबाइलचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. हा प्लॅन आपल्या वापरकर्त्यांना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत प्रवेश देतो.

एअरटेलचा 839 रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2 GB डेटा देत असून कंपनीच्या 5G नेटवर्क क्षेत्रात राहणाऱ्या युजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस मिळतील.

वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये तीन महिन्यांसाठी डिस्ने हॉटस्टार मोबाइलवर विनामूल्य प्रवेश मिळेल. प्लॅनमध्ये Airtel Xstream Play सबस्क्रिप्शनसह 15 पेक्षा जास्त OTT अॅप्स अनलॉक करता येईल. कंपनी प्लॅनमध्ये विंक म्युझिक मिळेल.

Vodafone-Idea चा 839 रुपयांचा प्लॅन

84 दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2 GB डेटा देत असून बिंज ऑल नाईट बेनिफिटमध्ये, कंपनी या प्लॅनमध्ये मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा देत आहे. Voda चा हा प्लॅन वापरकर्त्यांना देशभरातील सर्व नेटवर्कवर दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग देतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला डिस्ने हॉटस्टारचे तीन महिन्यांसाठी मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts