Jio Recharge Plan : युजर्सची मजा! ‘या’ प्लॅनमध्ये मोफत मिळतंय Netflix सह अनलिमिटेड 5G डेटा

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी सतत शानदार रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. ज्याचा कंपनीच्या ग्राहकांना खूप फायदा होतो. कंपनी कायम एअरटेल आणि इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत असते. कंपनीचे असे काही प्लॅन आहेत जे ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.

कंपनीच्या या प्लॅनमध्ये विनामूल्य चित्रपट आणि वेब सीरिज, अमर्यादित 5G डेटाचा समावेश केला आहे. इतकंच नाही तर कंपनीच्या या शानदार रिचार्ज प्लॅनची किंमत तुमच्या बजेटमध्ये आहे. जाणून घेऊयात कंपनीच्या या प्लानबद्दल सविस्तर माहिती.

रिलायन्स जिओचा 789 रुपयांचा प्लॅन

जिओचा हा प्लॅन संगीतप्रेमी वापरकर्त्यांसाठी खूप फायद्याचा आहे. कारण या प्लॅनमध्ये कंपनी JioSaavn Pro चे फ्री सब्सक्रिप्शन देत असून इंटरनेट वापरण्यासाठी, तुम्हाला या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटाचा आनंद घेता येईल. 84 दिवसांची वैधता असणारा हा प्लॅन पात्र वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा देतो.

हा प्लॅन देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस दररोज देते. प्लॅनमध्ये ऑफर केलेल्या अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर यात Jio TV आणि Jio Cinema चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

रिलायन्स जिओचा 1499 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओची ही मनोरंजन योजना नेटफ्लिक्स (बेसिक) च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येते, हे लक्षात ठेवा. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 3 जीबी डेटा देत असून प्लॅनमध्ये पात्र वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा दिला जात आहे. 84 दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस मिळतील. प्लॅनमध्ये उपलब्ध असणाऱ्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio TV आणि Jio सिनेमाचा मोफत प्रवेश समाविष्ट केला आहे.

रिलायन्स जिओचा 1099 रुपयांचा प्लॅन

कंपनीचा हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनीने इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2 जीबी डेटा दिला असून 1499 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे, या प्लॅनच्या पात्र सदस्यांना अनलिमिटेड 5G डेटा मिळेल. या शानदार प्लॅनमध्ये, कंपनी दररोज 100 मोफत एसएमएस आणि फ्री कॉलिंग देत आहे. अतिरिक्त फायद्यांबद्दल सांगायचे झाले तर, तुम्हाला नेटफ्लिक्स मोबाईलसह जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा विनामूल्य प्रवेश तुम्हाला मिळेल.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts