ताज्या बातम्या

Jio True 5G Wi-Fi : अरे व्वा..! आता 4G स्मार्टफोनवर चालणार 5G इंटरनेट, कसे ते जाणून घ्या

Jio True 5G Wi-Fi : 1 ऑक्टोबरपासून देशभरात 5G सेवा (5G services) सुरु करण्यात आली आहे. अशातच जिओनेही 5G सेवा (Jio 5G service) सुरु केली आहे.

5G साठी स्मार्टफोनही (5G smartphone) 5G असावा लागतो. परंतु, आता 4G स्मार्टफोनमध्येही (4G smartphone) 5G इंटरनेट चालणार आहे. जिओने Jio True 5G नेटवर्कवर चालणारी Wi-Fi सेवा (Jio Wi-Fi) चालू केली आहे.

Jio True 5G पॉवर्ड Wi-Fi लाँच करताना, आकाश अंबानीने (Akash Ambani) सर्वांना दिवाळीच्या (Diwali) खूप खूप शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की जिओचे हाय-स्पीड 5G नेटवर्क लवकरच देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू होईल. चेन्नईमध्ये कालच 5G नेटवर्क (Jio 5G) सुरू झाले आहे.

Jio वापरकर्त्यांना Jio वेलकम ऑफर कालावधीत ही नवीन वाय-फाय सेवा मोफत मिळेल. इतर नेटवर्क वापरणारे देखील Jio 5G Wi-Fi चा मर्यादित वापर करू शकतील. म्हणजेच, जर त्यांना Jio 5G पॉवर्ड Wi-Fi ची संपूर्ण सेवा वापरायची असेल, तर त्यांना Jio चे ग्राहक बनावे लागेल.

विशेष म्हणजे Jio True 5G Wi-Fi शी कनेक्ट होण्यासाठी ग्राहकाकडे 5G हँडसेट असणे आवश्यक नाही. तो 4G हँडसेटवरूनही या सेवेशी कनेक्ट होऊ शकतो. म्हणजेच वाय-फायच्या माध्यमातून 4G स्मार्टफोनमध्येही 5G सेवेचा लाभ घेता येतो.

नुकतीच दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. आता त्याचा विस्तार करत, कंपनीने नाथद्वारा आणि चेन्नईमध्ये आणले आहे. कंपनी लवकरच इतर शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे.

Jio True 5G Wi-Fi चे फायदे

  • जिओ वापरकर्त्यांना ‘वेलकम-ऑफर’ कालावधीत मोफत वाय-फाय सेवा मिळेल
  • 5G स्मार्टफोनशिवायही Wi-Fi शी कनेक्ट करून, 4G स्मार्टफोनवरही 5G इंटरनेटचा लाभ घेता येतो.
  • Jio True 5G Wi-Fi शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानके, बस स्टँड, व्यावसायिक हब यांसारख्या ठिकाणी जलद इंटरनेट प्रवेश सक्षम करेल.
  • दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीनंतर आता नाथद्वारा आणि चेन्नई Jio True 5G नेटवर्कशी जोडले गेले आहेत.
Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts