Jio VS Airtel Vs Vi : सर्व दूरसंचार कंपन्यांच्या (Telecom companies) रिचार्ज प्लॅनच्या (Recharge plan) किमतीत वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक (Financial) ताण वाढला आहे.
अशातच भारतात लवकरच 5G नेटवर्कची (5G network) सेवा सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रिचार्ज महाग (Recharge expensive) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हणाले जिओ?
आतापर्यंत कोणत्याही कंपनीने 5G प्लॅनच्या किंमतीबद्दल कोणतीही अंतिम माहिती दिलेली नाही. रिलायन्स जिओ (Reliance Jio) इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी म्हणाले की, “आम्ही ‘आझादी का अमृत महोत्सव’ संपूर्ण भारत 5G रोलआउटसह साजरा करू.
जिओ जागतिक दर्जाची, परवडणारी 5G सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही सेवा, प्लॅटफॉर्म आणि उपाय प्रदान करू जे भारताची डिजिटल क्रांती घडवून आणतील.
विशेषत: शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी, उत्पादन आणि ई-गव्हर्नन्स यासारख्या गंभीर क्षेत्रांमध्ये. माननीय पंतप्रधानांचे डिजिटल इंडिया मिशन साकार करण्यात हे आमचे पुढचे अभिमानास्पद योगदान आहे.”
अशा परिस्थितीत आपण अपेक्षा करू शकतो की जिओचे प्लॅन स्वस्त असतील. असो, सध्या जिओचे 4G प्रीपेड प्लॅन इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत.
एअरटेल काय म्हणाले?
एअरटेलने (Airtel)असेही म्हटले आहे की ते या महिन्यात व्यावसायिकरित्या 5G लाँच करणार आहेत. देशात 5G लाँच करण्यासाठी Airtel ने Nokia, Ericsson आणि Samsung सोबत भागीदारी केली आहे.
एअरटेलने प्लॅनच्या किंमतीबद्दल काहीही सांगितलेले नाही, परंतु टेलिकॉम उद्योगातील तज्ञांचे म्हणणे आहे की कंपनीचे प्लॅन 4G सारखे नसतील. 5G प्लॅनची किंमत 4G पेक्षा 15 टक्के जास्त असू शकते.
VI काय म्हणाले?
व्होडाफोन आयडियाचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर टक्कर यांनी म्हटले आहे की 4G च्या तुलनेत 5G प्लॅन प्रीमियम असतील, जरी 5G प्लॅनमध्ये 4G पेक्षा जास्त डेटा मिळेल.
5G स्पेक्ट्रम खरेदीसाठी कंपनीला प्रचंड पैसा खर्च करावा लागत असल्याचे टक्कर यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत व्होडाफोन आयडियाचे 5G प्लॅन स्वस्त होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले?
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 5G वर म्हटले आहे की, देशात 5G सेवेची किंमत कमी असेल. सामान्य माणसालाही 5G सहज वापरता येणार आहे.
ते म्हणाले की सरकार 12 ऑगस्टपर्यंत 5G स्पेक्ट्रमच्या वाटपाशी संबंधित सर्व काम पूर्ण करेल, त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरू करता येईल.