Reliance Jio Recharge Plan : जिओचा भन्नाट प्लॅन! फक्त 240 रुपयांमध्ये 8 महिने मोफत बोला, इंटरनेट आणि बरेच काही…

Reliance Jio Recharge Plan : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन प्लॅन घेऊन येत असते. त्यातील काही प्लॅन्स हे स्वस्त असतात तर काही प्लॅन महाग असतात. जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कंपनीने जिओ जिओ यूजर्ससाठी वेगवेगळ्या किंमतीचे प्लॅन आणले आहेत. या प्लॅनमध्ये फक्त डेटा नाही तर अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स तसेच दररोज एसएमएस JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे.

मिळणार 252 दिवसांची वैधता

रिलायन्स जिओच्या 2023 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता 252 दिवसांची असून या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2.5GB डेटा मिळतो. म्हणजेच यात ग्राहकांना एकूण 630GB डेटा दिला जाईल. ज्या ग्राहकांना दररोज जास्त डेटा लागतो त्यांच्यासाठी हा प्लॅन फायदेशीर आहे. शिवाय यामध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल्सची ऑफर मिळत आहे.

हे मिळतील फायदे

कंपनीच्या या प्लॅनमध्ये दररोज 100SMS मोफत उपलब्ध आहेत. तसेच या ग्राहकांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. Jio ची 5G सेवा वापरणारे ग्राहक देखील 5G ​​चा लाभ घेऊ शकतात.

Jio च्या 2023 च्या प्लॅनची ​​मासिक किंमत

या प्लॅनची ​​वैधता 252 दिवसांची आहे. जर या प्लॅनची ​​किंमत 8 महिन्यांनुसार काढली तर या प्लॅनची ​​किंमत सुमारे 240 रुपये होते. हा प्लॅन त्याच्या फायद्यांनुसार अतिशय चांगली आहे. सुरुवातीला तुम्हाला ते एकदा रिचार्ज केल्यावर महाग पडेल, मात्र हा प्लॅन मासिक खर्चानुसार बजेटमध्ये राहण्याचा प्लॅन आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts