Job In Railway : रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. यावेळी दक्षिण रेल्वेमध्ये अनेक अप्रेंटिस पदांची भरती होणार आहे. रेल्वेने अधिसूचना जारी (Notification issued) केली आहे.
1 ऑक्टोबरपासून अर्ज (Application) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दक्षिण रेल्वेसाठी 3150 पदांची (Post) भरती केली जाणार आहे. 10वी पास यासाठी अर्ज (Application) करू शकतात.
कोणत्या पदासाठी निवड केली जाईल?
रेल्वे रिक्रूटमेंट सेलने दक्षिण रेल्वेसाठी फिटर, वेल्डर, सुतार, पेंटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, वायरमन, लाइनमन आणि मेसन यासारख्या विविध पदांसाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या आहेत. नोकरीसाठी इच्छुकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना 2 वर्षांसाठी प्रशिक्षण दिले जाईल, त्यानंतर त्यांना यापैकी कोणत्याही पदावर नियुक्त केले जाईल. 1 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, 31 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
वय आणि पात्रता
15 ते 24 वयोगटातील लोक या रेल्वे पदांसाठी अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गाला वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे आणि SC/ST साठी 5 वर्षांची सूट आहे, तर अपंगांसाठी उच्च वयोमर्यादेत 10 वर्षांची सूट देण्यात आली आहे. अर्जासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
निवड कशी होईल?
दक्षिण रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवाराच्या ३१५० पदांवर थेट भरती केली जाणार आहे. निवडीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या परीक्षेला बसावे लागणार नाही, परंतु गुणवत्ता यादीच्या आधारे केले जाईल.
अर्ज शुल्क
एससी, एसटी, ओबीसी आणि दिव्यांगांना अर्जासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
इच्छुक उमेदवार दक्षिण रेल्वेच्या sr.indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी, तुम्ही दक्षिण रेल्वेच्या वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना पाहू शकता.