Jyotish Tips : शनिदेव आणि साडेसाती हा शब्द जरी काढला तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. खरंतर शनी हा लाभदायक ग्रह असून हा ग्रह लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देत असतात. लवकरच 4 राशींवर शनिदेव कृपा करतील.
सिंह रास
या राशीसाठी 4 नोव्हेंबर 2023 रोजी होणारा शनीची दिशा बदल अतिशय शुभ मानला जातो. 2024 च्या अखेरीस तुम्हाला शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळेल. पैशाशी निगडित समस्यांपासून तुमची सुटका मिळेल. या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता. तुमची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस सुधारेल. व्यावसायिक व्यवहारासाठी हा खूप फायदेशीर आहे. तुमची बिघडलेली कामे मार्गी लागतील. नोकरदार लोकांची आर्थिक स्थिती या काळात सुधारेल.
कन्या रास
कन्या रास असणाऱ्या लोकांना याचा खूप फायदा होईल. 2024 च्या शेवटपर्यंत तुमच्यावर शनिदेवाची कृपा असेल. त्यामुळे शनीची साडेसाती आणि धैयामध्येही दिलासा मिळेल. या काळात तुम्हाला आर्थिक कामात चांगले यश मिळेल.
तसेच शनि संक्रमणाच्या काळात आर्थिक लाभ होईल. या शिवाय या काळात तुम्हाला नवीन वाहन किंवा जमीन किंवा इमारत खरेदी करता येईल. तुम्ही व्यवसायात पैसे गुंतवले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल.
धनु रास
शनीचे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नसेल असे म्हणता येईल. या राशीवर शनिदेव 2024 च्या शेवटी आशीर्वाद देतील. त्यामुळे तुम्हाला नोकरीतील बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. या काळात अचानक आर्थिक लाभ होण्याच्या अनेक शक्यता असतील. इतकेच नाही तर तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. काही मोठ्या कायदेशीर वादातून दिलासा मिळेल.
मिथुन रास
मिथुन रास असणाऱ्या लोकांसाठी शनि संक्रमण कोणत्या वरदानापेक्षा कमी नाही. 4 नोव्हेंबरपासून या राशीच्या लोकांना चांगले दिवस येतील. 2024 च्या अखेरीस घरात धन येईल. तुम्हाला या काळात व्यवसाय आणि नोकरीत चांगला आर्थिक लाभ होईल. तसेच हा काळ व्यवहारासाठी फायदेशीर राहील. व्यवसायात फायदा होईल. या काळात तुम्हाला नवीन काम सुरू करता येईल.