मालकाला अंधारात ठेवून कामगारांनीच 50 लाखांच्या खतांची परपस्पर केली विक्री

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- राहाता तालुक्यातील एका कंपनीच्या गोडाऊनमधून मॅनेजर व तीन कामगारांनी कंपनीच्या मालकाला अंधारात ठेवत परस्पर 50 लाख रुपये किंमतीच्या खतांची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी राहाता पोलिसांनी कंपनीच्या मॅनेजर व तीन कामगार विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कंपनीचे मालक सचिन मनोहर पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझी सहा वर्षांपासून मुंबई भिवंडी येथे अमेरिकन फेट्रो केम या नावाने ऑरगॅनिक सेंद्रीय औषधे निर्माण करण्याची कंपनी असून तिथे तयार होणारे औषधे गोडाऊनमध्ये ठेवून ते दुकानदारांपर्यंत पोहचवतो.

त्या कामासाठी मी पिंपळस तालुका राहाता येते रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून दत्तात्रेय किसन राजभोज (राहणार कोल्हार) यांची नियुक्ती केली. त्याच्याकडे गोडाऊनची चावी व संपूर्ण व्यवहार असतो. त्याने माझी कुठलीही परवानगी न घेता मंगेश मच्छिंद्र बोराडे (राहणार कोल्हार), मंगेश केसरकर (राहणार ममदापूर) व गणेश तेलोरे (राहणार वाकडी) या तीन व्यक्तींची कंपनीमध्ये नेमणूक केली.

एकेदिवशी मी पिंपळस येथे आलो असता गोडाऊन मध्ये जाऊन कंपनीच्या साठवलेल्या मालाची पाहणी केली असता, विक्री करून शिल्लक असलेल्या मालाची मला मोठी तफावत आढळून आली. मॅनेजर दत्तात्रेय राजभोज व इतर तिघांना कंपनीच्या रजिस्टर व औषधाच्या बॉक्स बाबत चौकशी केली असता, त्यांनी मला उडवाउडवीचे उत्तरे दिले.

त्यामुळे मला त्यांच्यावर संशय आल्याने, मी बॉक्स बाबत खात्री केली तर सेंद्रीय औषधचे 514 बॉक्स किंमत 50 लाख 34 हजार 414 फसवणूक झाल्याचे आढळून आले. त्यावरून राहाता पोलिसांनी वरील चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts