ताज्या बातम्या

Kidney Infection : ‘या’ चुकीच्या सवयी टाळा अन्यथा वाढू शकतो युरिन इन्फेक्शन ते किडनी स्टोनचा घोका

Kidney Infection : धावपळीच्या जगात चुकीचा आहार (Wrong diet) आणि व्यायामाचा अभाव असल्याने बऱ्याच आजारांचा (Disease) सामना करावा लागत आहे. यापैकी काही आजारांवर आपण घरच्या घरीच उपाय करू शकतो.

त्यापैकी किडनीतील संसर्गाचा (Kidney Infection) धोका बऱ्याच जणांना आहे. यावर वेळीच उपाय न केल्यास त्यात वाढ होऊन गंभीर समस्येला (Problem) सामोरं जाण्याची वेळही अनेकांवर येते.

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा लघवीची पिशवी (Urine bag) अर्ध्याहून अधिक भरलेली असते तेव्हा ती लघवी करण्याची वेळ आल्याचा मेंदूला (Brain) सिग्नल पाठवते. अशा स्थितीत लघवी रोखून ठेवल्याने संबंधित अवयवांवर परिणाम होतो.

त्यामुळे किडनी आणि मूत्रमार्गावर परिणाम होऊ लागतो, ज्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने कोणते दुष्परिणाम शकतात.

लघवी करताना वेदना

जर तुम्हाला वारंवार लघवी रोखून ठेवावी लागत असेल तर त्यामुळे मूत्राशय किंवा मूत्रपिंडात वेदना आणि अस्वस्थता होऊ शकते. इतकंच नाही तर अनेकदा लघवी रोखून ठेवावी लागत असेल तर त्यामुळे मूत्रमार्गात आणि संबंधित स्नायूंमध्ये जडपणा येऊ शकतो, ज्यामुळे लघवी करताना वेदनाही होऊ शकतात. अशा सवयी टाळा.

मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे तुम्हाला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. विशेषत: जर एखाद्या व्यक्तीला आधी UTI ची समस्या असेल तर त्यामुळे धोका अधिक वाढतो. याव्यतिरिक्त, जे लोक पुरेसे पाणी पीत नाहीत त्यांना यूटीआय होण्याची शक्यता असते.

किडनी स्टोनची समस्या वाढत आहे

लघवी जास्त वेळ रोखून ठेवण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका मानला जातो. लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने त्यातील मिनरल्सचे प्रमाण वाढते.

लघवीमध्ये युरिक ऍसिड आणि कॅल्शियम ऑक्सलेट सारखी खनिजे असतात, त्यामुळे जर ते वेळेत बाहेर काढले नाहीत तर ते मूत्रपिंडात जमा होण्याचा धोका असतो, ज्यामुळे दगड तयार होऊ शकतात.

मूत्राशय समस्या

जास्त वेळ लघवी धरून राहिल्यास मूत्राशयावर ताण येण्याचा धोकाही असू शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये, यामुळे मूत्राशय आकुंचन पावणे आणि सामान्यपणे सोडणे कठीण होऊ शकते. लघवीच्या पिशवीत उद्भवणाऱ्या अशा प्रकारच्या समस्या शरीराच्या इतर भागांवरही नकारात्मक परिणाम करू शकतात, याबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts