ताज्या बातम्या

KK Postmortem Report : प्रसिद्ध गायक केकेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून धक्कादायक खुलासा ! यामुळे वाचू शकला असता जीव

KK Postmortem Report : चित्रपट इंडस्ट्रीत (Film industry) फेमस असणारे प्रसिद्ध गायक (Famous singers) कृष्णकुमार कुननाथ (Krishnakumar Kunnath) म्हणजेच केके यांचे मंगळवारी ३१ मे रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

गायक त्या दिवशी कोलकातामधील एका कॉन्सर्टमध्ये लाईव्ह (Concert Live) परफॉर्मन्स देऊन हॉटेलमध्ये परतला आणि अचानक त्याची तब्येत बिघडू लागली, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच त्याचा मृत्यू (Death) झाला.

केकेच्या अकाली आणि आकस्मिक मृत्यूमुळे चाहते खूप दु:खी झाले आहेत आणि सिंगरचे अनेक व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता ही प्रतीक्षा संपली असून केकेच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले आहे.

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

मुंबईतील वर्सोवा येथे गायक केके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. दरम्यान, केकेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट (Postmortem report) समोर आल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे.

ज्यामध्ये गायकाच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचं सांगण्यात आलं आहे, त्यासोबतच त्यांना सीपीआर दिला असता तर त्यांचा जीव वाचू शकला असता असा दावाही करण्यात आला आहे.

सीपीआर म्हणजे काय

सीपीआर (CPR) म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन जी आपत्कालीन परिस्थितीत दिली जाते. याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत श्वास देऊन एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतात.

मंगळवारी जगाचा निरोप घेणारे गायक कृष्णकुमार कुननाथ म्हणजेच केके यांचे पोस्टमॉर्टम एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. यानंतर त्यांचे पार्थिव कोलकाता येथील रुग्णालयातून रवींद्र सदनात पोहोचले.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts