Hyundai Exter खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या किती काळ करावी लागेल प्रतीक्षा?

Hyundai Exter : Hyundai Exter ची वाट बघणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. Hyundaiने आता आपल्या Exeter चा प्रतीक्षा कालावधी वाढवला आहे. क्रेटा नंतर ही कंपनीची सर्वात स्वस्त मायक्रो एसयूव्ही असणार आहे. Exeter चा प्रतीक्षा कालावधी EX आणि EX(O) प्रकारांसाठी 1 वर्षाने वाढला आहे. इतर प्रकारांसाठी प्रतीक्षा कालावधी 5 ते 6 महिने आहे.

तुमच्या माहितीसाठी EXTER 7 प्रकारांमध्ये सादर करण्यात आले आहे. EX, EX(O), S, S(O), SX, SX(O) आणि SX(O) कनेक्ट आहेत. मायक्रो SUV ची किंमत 6 लाखांपासून सुरू होते आणि 10.10 लाखांपर्यंत जाते. दोन्ही किंमती एक्स शोरूम आहेत. भारतीय बाजारपेठेत ही कार मारुती सुझुकी इग्निस, रेनॉल्ट किगर, सिट्रोएन सी3 आणि निसान मॅग्नाइटशी स्पर्धा करेल.

त्याच वेळी, ही कार सीएनजीसह पेट्रोल पॉवरट्रेनमध्ये देखील सादर केली गेली आहे. याचे इंजिन 1.2-लिटर, चार-सिलेंडरने सुसज्ज आहे. जे ८१.८६ बीएचपी पॉवर आणि ११३.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. CNG मध्ये ते 68 Bhp आणि 95.2 Nm पर्यंत कमी होते.

Hyundai Exter वैशिष्ट्ये

Hyundai Xter मध्ये LED हेडलॅम्प, LED टेल लॅम्प, अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay सह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ESC आणि हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह येतो.

Hyundai Exter डिझाइन

डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ही कार बॉक्सी डिझाइन लँग्वेज आणि ड्युअल-टोन एक्सटीरियर पेंट स्कीमसह येते. यामध्ये कंपनीने स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ दिले आहे. यासोबतच यात ड्युअल कॅमेऱ्यासह डॅश कॅम युनिट आणि 2.31-इंचाचा डिजिटल डिस्प्ले आहे.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts