Transaction Limit : सध्या अनेकजण बँकेच्या लांबच लांब रांगेत उभे राहून पैसे काढण्याचे टाळते. आता प्रत्येकजण GPay, PhonePay आणि Paytm सारख्या अॅप्सचा वापर करून आर्थिक व्यवहार करत आहेत.
परंतु, आता या सर्व पेमेंट प्लॅटफॉर्मने ठराविक व्यवहार मर्यादा सेट केली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांची काहीशी निराशा झाली आहे. जर तुम्हीही हे अॅप्स वापरत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा. नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
इतकी आहे मर्यादा
याबात NPCI ने मार्गदर्शक काही तत्वे जरी केली आहेत. तत्त्वांनुसार, एखाद्या व्यक्तीला दररोज UPI द्वारे कमीत कमी 1 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करता येईल कॅनरा बँक सारख्या छोट्या बँकाना केवळ रु. 25,000 ला अनुमती देतात. SBI सारख्या मोठ्या बँकांनी दैनंदिन UPI व्यवहाराची मर्यादा रु. 1,00,000 ठेवली आहे.
दररोज इतकी असणार मर्यादा
आणखी एक महत्त्वाचे म्हणजे मनी ट्रान्सफर मर्यादेसोबतच, एका दिवसात केल्या जाणाऱ्या रक्कमेवरही मर्यादा आहे. त्यामुळे ग्राहकांना दिवसातून फक्त 20 वेळा UPI ट्रान्सफर करता येणार आहे. ही मर्यादा संपल्यानंतर, मर्यादेचे नूतनीकरण करण्यासाठी ग्राहकांना आता 24 तास प्रतीक्षा करावी लागेल. त्याशिवाय हे लक्षात घ्या की, बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मर्यादा बदलली जाऊ शकते.
Google Pay
Google Pay आपल्या ग्राहकांना सर्व UPI अॅप्स आणि बँक खात्यांमध्ये एकूण 10 व्यवहारांच्या मर्यादेसह दररोज 1,00,00 रुपयांपर्यंतचे पैसे ट्रान्सफर करण्यास अनुमाती देते. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीने जरी 2,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे पाठवले तरीही GPay दैनंदिन व्यवहार मर्यादा ग्राह्य धरते.
पेटीएम
इतर अॅपप्रमाणे पेटीएम आपल्या वापरकर्त्यांना 1 लाख रुपयांपर्यंत पैसे ट्रान्सफर करण्यास अनुमती देते. त्याशिवाय, हे अॅप वापरकर्त्यांना प्रति तास आणि दैनंदिन मनी ट्रान्सफर मर्यादा देखील सेट करते.
पेटीएम दैनंदिन मनी ट्रान्सफर मर्यादा – रु 1,00,000
पेटीएम प्रति तास मनी ट्रान्सफर मर्यादा – रु. 20,000
PhonePe
PhonePe ने आपल्या ग्राहकांसाठी UPI व्यवहाराची मर्यादा 1,00,000 रु इतकी सेट केली आहे. त्याशिवाय बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एखाद्या ग्राहकाला PhonePe UPI द्वारे दररोज जास्तीत जास्त 10 किंवा 20 व्यवहार करता येतात. GPay प्रमाणे, Phonepe देखील 2000 रुपयांवरील व्यवहार ग्राह्य धरत नाही.