Lakshmi Pujan 2021 : लक्ष्मीपुजन हा सण का साजरा करतात ?

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- हिंदू धर्मातील दिवाळी हा सण सर्वात आनंदाचा आहे. लक्ष्मीपूजन आश्विन अमावास्येला केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल आणि प्रसन्न देवता आहे. अनेक घरात लक्ष्मीचे पाठही केले जाते. देवी महालक्ष्मी सतत प्रसन्न राहावी.

घरात तीचे आगमन व्हावे म्हणून आश्विन अमावास्येला लक्ष्मीचे पूजन केले जाते.अशी पुराणकथा आहे की, प्रभु श्रीराम चौदा वर्षांचा वनवास पुर्ण करुन अश्र्विन अमावस्येला अयोध्यात आले होते त्याचा आगमानाचे स्मरण म्हणून दिपावली हा सण उत्सव साजरा केला जातो.

लक्ष्मीपूजन हा सण तसेच उत्सव हिंदू धर्मातील स्त्रिया मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करताना आपणास दिसुन येतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवे लावल्यावर सर्व स्त्रिया तसेच लहान मुले आनंदी राहत असतात व त्या दिवशी दिपोत्सव देखील साजरा केला जातो.

तसेच व्यापारी लोक आपल्या हिशोबाचे पुस्तक याची सुद्धा पूजा करतात तसेच येथूनच लक्ष्मी पूजनापासून व्यापारी नववर्षाची सुरू होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा.अंधाराला दूर करून प्रकाशाची निर्मिती करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जात असतो.

त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील जो काही अंधकार आहे तो दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जात असतो. पावसाळ्यात साजरा केला जाणारा एक समृद्धीचा,आणि आनंद उत्सवाचा,तसेच कृतज्ञतेचा दिवस तसेच सोहळा म्हणुन हा ओळखला जातो.

या दिवसांमध्ये घरोघरी सायंकाळी दारासमोर अंगणात रांगोळ्या काढून पणत्या लावल्या जातात. घरासमोर दारात,अंगणात आकाशदिवे लावले जात असतात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात.त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात.

या मुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारसाचे जतन होते. दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच निलमत पुराण ग्रंथात या सणास “दीपमाला” असे म्हटले आहे. कनोजाचा राजा न याने नागानंद नाटकात या सणाला “दीपप्रतिपदुत्सव” असे नाव दिले आहे.

ज्योतिषरत्नमाला ह्या ग्रंथामध्ये “दिवाळी” हा शब्द वापरला गेलेला आपणास दिसुन येतो. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला “दीपालिका” असे म्हटले गेले आहे, तसेच काल्विवेक या ग्रंथात याचा उल्लेख “सुखरात्रि” असा करण्यात आलेला दिसुन येतो. व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये “सुख सुप्तिका” म्हणून देखील दिवाळीचा उल्लेख केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe