ताज्या बातम्या

Petrol Diesel Price Today : जाहीर झाले पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर, पंपावर जाण्यापूर्वी जाणून घ्या

Petrol Diesel Price Today : सतत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत आपल्याला चढ किंवा उतार पाहायला मिळतात. अशातच गेल्या 7 महिन्यांपासून देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर हे जैसे थे आहेत.

म्हणजे त्यात कोणतेही बदल झाले नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतरही 21 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही.

दिल्लीमध्ये आज एक लिटर पेट्रोलसाठी 96.72 रुपये तर डिझेलसाठी 89.62 रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहे. सध्या मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर इतका आहे.

कोलकात्यात पेट्रोलसाठी 106.03 रुपये तर डिझेलसाठी 92.76 रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

अशी आहे प्रमुख महानगरांमधील किंमत 

शहर डिझेल पेट्रोल
दिल्ली 89.62 96.72
मुंबई 94.27 106.31
कोलकाता 92.76 106.03
चेन्नई 94.24 102.63

 

 

एसएमएसद्वारेही समजतात दर 

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही समजते. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जावे लागेल. दररोज सकाळी सहा वाजता या दरात बदल होतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts