ताज्या बातम्या

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल- डिझेलचे ताजे दर जाहीर, जाणून घ्या आजची किंमत

Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-diesel rates) जाहीर केले. आजचा दिवस तेलाच्या किमतीच्या दृष्टीने दिलासा देणारा ठरला आहे. वास्तविक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशाच्या राजधानीत आज पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

IOCL च्या ताज्या अपडेटनुसार, कोणत्याही शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झालेला नाही. आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) आज एक लिटर पेट्रोल 111.35 रुपयांना तर डिझेल 97.28 रुपयांना विकलं जात आहे.

याशिवाय चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर येथे डिझेल 102.63 रुपये आणि 94.24 रुपये आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपयांना विकले जात आहे.

दुसरीकडे, यूपीची राजधानी लखनऊमध्ये (Lucknow) पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये दराने विकले जात आहे. पाटण्यात एक लिटर पेट्रोलची किंमत 107.24 रुपये आणि एक लिटर डिझेल 94.04 रुपये आहे. देशातील सर्वात कमी पेट्रोलची किंमत पोर्ट ब्लेअर (Port Blair) मध्ये आहे, जिथे एक लिटर 84.10 रुपये आणि एक लिटर डिझेल 79.74 रुपयांना उपलब्ध आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा –

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (Indian Oil) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात –

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts