ताज्या बातम्या

आघाडीमधील नेते म्हणतात ..अकेला देवेंद्र क्या करेगा? तर चित्रा वाघ म्हणाल्या, तुमच्या तिघांचा धुर..

मुंबई : राज्यातील राजकारणात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सतत टीका होत असते, मात्र भाजपकडून (BJP) देखील या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले जाते.

आताही राज्यसभेच्या निवडणुकांवरुन सरकारमधील मंत्र्यांकडून फडणवीसांवर टीका होत आहे. ‘अकेला देवेंद्र क्या करगा,’ अशाप्रकारचे वक्तव्य सरकारमधील नेत्यांकडून होत आहे.

त्यांच्या या विधानाचा आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी समाचार घेत सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. यावेळी त्या शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे (Talegaon Dhamdhere) या ठिकाणी महिला मेळाव्यात बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ”अकेला देवेंद्र क्या करेगा? अशी टीका महाविकास आघाडी सरकारमधील नेते करत आहेत. राज्यात महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची ताकद आहे, पण एकट्या देवेंद्र फडणवीसांनीच तुमच्या तिघांचा धुर काढलाय. आता तिघांनाही समजल आहे की, अकेला देवेंद्र काय काय करतोय”, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, “राज्यसभेच्या (Rajya Sabha) दोन जागा तर आम्ही जिंकणारच, मात्र तिसरी जागाही सहज जिंकू.” यावेळी वाघ यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेवरही भाष्य केले आहे. “राज्यातील सरकारी दवाखान्यात सामान्य नागरिक जाण्यासाठी घाबरतोय.

मोठे नेतेही सरकारी दवाखान्यांवर (government hospitals) विश्वास ठेवत नाहीत, तर गोरगरीबांनी तरी कसा विश्वास ठेवायचा? कोरोना काळात राज्यातील नेत्यांनी खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले, या नेत्यांची बिलही समोर आली,” असेही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts