ताज्या बातम्या

गाजराची लागवड कशी करावी, घ्या जाणून सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News  :-आरोग्यासाठी आणि नफ्यासाठी शेतकर्याने गाजराची लागवड करणे अत्यंत महत्त्वाची आहे. गाजर म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो सुंदर लाल रंगाचा आणि चवदार गाजराचा हलवा.गाजरा मध्ये व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात आढळते.गाजराचे कच्चा सॅलडच्या स्वरूपात खूप फायदे आहेत.

तर गाजर लागवडीसाठी कोणते नियोजन केले पाहिजे ते आपण पाहू.

गाजर पिकासाठी योग्य हवामान. गाजर पिकासाठी 8 ते 28 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. तर जास्त उष्ण असलेल्या भागात त्याची वाढ होत नाही. म्हणजे का जर हे थंड हवामानातील पीक आहे.

माती निवड. गाजराच्या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी चिकन माती सर्वोत्तम ठरते. त्यात गाजराचे पिक चांगल्या प्रकारे येते. तर पाणी साचलेल्या जमिनीत मुळे कुजण्याची व पीक निकामी होण्याचा धोका राहतो.

लागवड वेळ. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यानचा काळ हा गाजर पेरणीसाठी योग्य असतो. तर ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या काळात लागवड केली जाते.

जमीन मशागत व शेण खत टाकणे. गाजर पिकासाठी निवडलेल्या शेतात शेणखत टाकणे अत्यंत महत्त्वाचे असते.कारण त्यामुळे शेतातील उत्पादनही वाढते. शेणखत टाकण्याआधी जमीन 2 ते 3 वेळा नांगरणी करून व्यवस्थित भुसभुशीत करून घ्यावी.शेवटच्या नांगरणीच्या वेळी हेक्टरी 35 टन शेणखत वापरल्यास गाजरांचे चांगले उत्पादन होण्यास मदत होते.

गाजराच्या सुधारित जाती. 1.पुसा केसर

2.पुसा मेघालय

3.गाजर 29

4.हिसार रसाळ

शेतकर्याने ह्या जाती च्या वानाची ज्यात्या भागा नुसार निवड करावी.

सिंचन व्यवस्थापन. गाजराच्या पिकासाठी 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी देणे फायदेशीर ठरते. तर यासाठी पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था शेतात असली पाहिजे.

खत व्यवस्थापन:

गाजर पिकासाठी मुख्यत 3 खतांची आवश्यकता असते.

1. पोटॅश

2.डॅप

3.नायट्रोजन गाजर लागवडीच्या वेळी या खतांचा वापर 30 किलो नत्र व 30 किलो पालाश प्रति हेक्‍टरी खत म्हणून वापरावा.

खर्च,उत्पादन,कमाई: एक हेक्टर क्षेत्रामधून गाजराच्या काही जाती पासून 150 क्विंटल पर्यंत उत्पादन निघू शकते. गाजर पिकास तयार होण्यास 70 ते 75 दिवसांचा कालावधी लागतो. तर 1 किलो गाजर पिकवण्यासाठी 6 ते 8 रुपये खर्च येतो.तर एखाद्या व्यक्तीने 1 किलो गाजर पिकवले तर त्याची किंमत 7 ते 8 रुपये असते.

गाजराची बाजारात ₹ 40 प्रति किलोपर्यंत असते. त्यानुसार पाहिल्यास 1 हेक्‍टरमधून सुमारे 7 लाख ते 14 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts