LED Bulb : उन्हाळ्याच्या दिवसात विजेचा वापर जास्त असल्यामुळे वीजबिलाचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत आहे. जर तुम्हाला आर्थिक फटका बसत असेल तर तुमच्याकडे एक सुवर्णसंधी आहे.
कारण तुम्ही आता वीजबिलापासून सुटका मिळवू शकता. यासाठी तुम्हाला बाजारात मिळणारा LED बल्ब खरेदी करावा लागणार आहे. या LED बल्बमुळे तुमच्या वीजबिलाची कटकट कायमची मिटू शकते. या बल्बचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ते मोठ्या प्रमाणात विजेची बचत करते. तसेच किंमतही खूपच कमी आहे.
सध्या प्रत्येक खोलीत वेगवेगळे बल्ब दिसत असून त्यापैकी काही फॅन्सी लाईट्सदेखील आहेत. जर तुम्हाला या फॅन्सी लाईट्समुळे खूप खर्च होत आहे असे वाटत असल्यास तुम्ही ते आता सहज बदलू शकता.
किती आहे स्वस्त बल्बची किंमत ?
तुम्हाला आता बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे हे बल्ब मिळतील जे 9 वॅटचे आहेत. या श्रेणीतील Syska बल्ब, हे बल्ब 90% कमी ऊर्जा वापरत असतात.जे तुम्हाला सहजपणे Amazon या ऑनलाइन वेबसाइटवरून खरेदी करता येईल. या बल्बची किंमत फक्त 115 रुपये इतकी आहे. तुम्ही हे एलईडी बल्ब तुमची खोली, हॉल किंवा स्वयंपाकघर अशा कोणत्याही ठिकाणी सहजपणे लावू शकता. याच्या मदतीने तुमच्या खोल्या कितीतरी पटीने जास्त उजळू शकणार आहेत.
तर दुसरा बल्ब विप्रो कंपनीचा उपलब्ध आहे. या बल्बसाठी 9 वॅट्सचा बेस बी22 दिला आहे. या एलईडी बल्बचा प्रकाश 15 वॅट सीएफएल इतका आहे. त्याचे रंग तापमान 2700k इतके आहे. तसेच लुमेनला 800 एलएम देण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा बल्ब अतिशय टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणारा आहे. या बल्बवर २ वर्षांची वॉरंटी उपलब्ध असून तो सहज कोणत्याही धारकावर माउंट करण्यात येऊ शकते. किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत फक्त 100 रुपये आहे.