LIC Offer : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीकडे लाखो ग्राहक आहे. प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी ती अनेक योजना राबवत असते. यात गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा फायदा होतो. जर तुम्ही LIC चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे.
एलआयसी ऑफर: कारण आता एलआयसीने एक नवीन मोहीम सुरू केली असून तुम्हाला पॉलिसीवर 4000 रुपयांची सवलत मिळणार आहे. एलआयसीने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तुम्ही देखील या सवलतीचा लाभ घेऊ शकता. परंतु त्यासाठी काही अटी आहेत.
याबाबत एलआयसीने ट्विटरवर माहिती दिली आहे. कंपनीने एक विशेष पुनरुज्जीवन मोहीम सुरू केली असून यात पॉलिसीधारकांना त्यांची लॅप्स पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी देण्यात येत आहे. जर तुम्हाला या विशेष पुनरुज्जीवन मोहिमेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही एलआयसी शाखेशी संपर्क साधू शकता.
मिळेल 30 टक्के सवलत
तर त्याच वेळी, जर समजा चुकून तुमची फी उशीर झाली, तर तुम्हाला विलंब शुल्कामध्ये तब्बल 30 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. परंतु हे लक्षात ठेवा की ज्या ग्राहकांचा विमा हप्ता 5 वर्षांपेक्षा जास्त आहे ते त्यांना त्याचा लाभ घेता येणार नाही.
विलंब शुल्कावर मिळेल सवलत
LIC आपल्या ग्राहकांना विलंब शुल्कामध्ये 30% पर्यंत सूट देत असून हे लक्षात घ्या की ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंतच्या प्रीमियमसह पॉलिसींवर 3 हजार रुपयांपर्यंतच्या सवलतीचा लाभ मिळेल. तसेच जर तुमच्या पॉलिसीचा प्रीमियम 1 ते 3 लाख रुपयांच्या दरम्यान असल्यास त्यावर तुम्हाला 3500 रुपयांची सवलत मिळेल.
3 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पॉलिसींवर, तुम्हाला विलंब शुल्कामध्ये 4,000 रुपयांपर्यंत शानदार सवलत मिळेल. समजा जर तुम्हाला या मोहिमेबद्दल संपूर्ण माहिती मिळवायची असल्यास तुम्ही कंपनीच्या http://licindia.in या अधिकृत लिंकला सहज भेट देऊ शकता.