LIC Offer : LIC कडे सर्व वयोगटातील लोकांसाठी शानदार प्लॅन असतात. तुम्ही आता कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. ज्यामुळे तुम्हाला हजारो रुपायांची सहज कमाई करता येईल. आता तुम्हाला LIC कडून एक संधी मिळत आहे.
तुमची एलआयसी पॉलिसी लॅप्स झाली असल्यास तर तुम्हाला ती पुन्हा चालू करण्याची उत्तम संधी असून LIC ने लाखो पॉलिसीधारकांना त्यांच्या लॅप्स झालेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या विशेष पुनरुज्जीवन मोहिमेत, LIC विलंब शुल्कावर 30 टक्के सवलत देत असून जी वेगवेगळ्या प्रीमियमच्या रकमेनुसार 4000 रुपयांपर्यंत असेल. हे लक्षात घ्या कीं एलआयसीची ही विशेष पुनरुज्जीवन मोहीम 1 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. ती 31 ऑक्टोबरपर्यंत चालेल. त्यांनंतर तुम्हाला LIC च्या या शानदार ऑफरचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर ऑफरचा लाभ घ्या.
प्रीमियमची रक्कम 1,00,000 रुपयांपर्यंत असेल तर, तुम्हाला विलंब शुल्कावर 30 टक्के सवलत आणि जास्तीत जास्त 3,000 रुपये मिळू शकतात. तर त्याच वेळी, जर तुमची देय रक्कम 1,00,001 ते 3,00,000 रुपयांच्या दरम्यान असल्यास तर विलंब शुल्कावर 30 टक्के सवलत आणि जास्तीत जास्त 3,500 रुपये दिले जातील. इतकेच नाही तर 3,00,001 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेवर 30 टक्के आणि कमाल 4,000 रुपयांची सवलत मिळू शकते.
एलआयसीच्या या विशेष पुनरुज्जीवन मोहिमेअंतर्गत, शेवटचा प्रीमियम भरला तर 5 वर्षांपासून बंद असणाऱ्या सर्व पॉलिसी सुरू केल्या जाण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर पॉलिसीनुसार त्याच्याशी संबंधित सेवा आणि अटी बदलू देखील शकतात.
तुम्ही LIC वेबसाइट आणि जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क करू शकता. LIC ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असून LIC च्या देशभरात हजारो शाखा तसेच लाखो एजंट आहेत आणि 29 कोटींहून जास्त विमाधारक आहेत.