LIC Plans : LIC ची सर्वोत्तम पॉलिसी! आजच करा गुंतवणूक, शानदार परताव्यासह मिळतील अनेक फायदे

LIC Plans : लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारतीयांसाठी सतत वेगवेगळे प्लॅन्स आणत असते. जर तुम्ही LIC च्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला शानदार मिळतो, तसेच यात गुंतवलेल्या रकमेवर जोखीम घ्यावी लागत नाही.

त्यामुळे अनेकजण या योजनेत गुंतवणूक करतात. जर तुम्हालाही उत्तम परतावा पाहिजे असेल तर तुम्हीदेखील LIC च्या योजनेत गुंतवणूक करू शकता. कंपनीच्या अशा काही योजना आहेत ज्यात शानदार परताव्यासह अनेक फायदे मिळत आहेत.

एलआयसी जीवन उमंग पॉलिसी

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे समजून घ्या की एलआयसीची जीवन उमंग विमा पॉलिसी ही सर्वोत्तम परताव्याच्या योजनांपैकी एक आहे. एलआयसीच्या या पॉलिसीसह, गुंतवणूकदाराला वयाच्या 100 वर्षापर्यंत कव्हरेज मिळते. शिवाय ही योजना कुटुंबाच्या आर्थिक कव्हरेजसाठी बचत आणि कमाईच्या दुहेरी लाभांसह येते. यात गुंतवणूकदाराला शेवटी निश्चित हमी रकमेचे पेमेंट दिले जाते. यात गुंतवणूकदाराना वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक प्रीमियम भरता येतो.

एलआयसी नवीन जीवन अमर योजना

LIC ची जीवन अमर ही टर्म इन्शुरन्स आणि नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग योजना असून या अंतर्गत, कंपनी गुंतवणूकदाराच्या कुटुंबाला दुर्दैवी घटना घडली तर आर्थिक सुरक्षा प्रदान करते. तसेच मृत्यू लाभाअंतर्गत, गुंतवणूकदाराच्या कुटुंबाला वैयक्तिक कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनुकूल कव्हरेज सोल्यूशन मिळते. गुंतवणूकदाराना या मुदतीच्या विमा योजनेत कोणत्याही प्रकारचा कोणताही परिपक्वता लाभ मिळत नाही, हे लक्षात ठेवा.

एलआयसी नवीन जीवन शांती पॉलिसी

LIC कडून नवीन जीवन शांती योजना सादर करण्यात आली आहे. याला उत्तम परतावा देणारी पॉलिसी असेही म्हटले जाते. या योजनेमध्ये 30 ते 79 वयोगटातील लोकांना गुंतवणूक करता येते. यात 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिकी दिली जाते. LIC या योजनेमध्ये गुंतवणूकदार कमीत कमी 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. तर, जास्तीत जास्त गुंतवणुकीच्या रकमेसाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आली नाही. ही योजना एकल जीवन आणि संयुक्त जीवनासाठी स्थगित वार्षिकी पर्यायासह येते.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts