LIC Policy : एलआयसीकडे प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी योजना आहेत. जर तुम्ही एलआयसीच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला उत्तम परतावा मिळतो. त्यामुळे अनेकजण एलआयसीच्या योजनेत गुंतवणूक करतात.
एलआयसीची एक अशी पॉलिसी आहे जी आजपासून संपत आहे. एलआयसीच्या या शानदार पॉलिसीचे नाव एलआयसी धन वृद्धी पॉलिसी असे आहे. ही एकल प्रीमियम पॉलिसी असून जी आपल्या गुंतवणूकदाराला हमी परतावा देते. आजच या योजनेत गुंतवणूक करा.
तुमच्याकडे आज LIC सिंगल प्रीमियम स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी असून कंपनीने आर्थिक सुरक्षा आणि वाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही शानदार योजना तयार केली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर आता तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.
सिंगल प्रीमियम पॉलिसी
हे लक्षात घ्या की एलआयसी धन वृद्धी पॉलिसीची पॉलिसी टर्म 10 वर्षे निश्चित केली असून ही एक सिंगल प्रीमियम पॉलिसी आहे. याचा असा अर्थ की तुम्हाला एलआयसी पॉलिसीमध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही आयुष्यभर या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमध्ये वापरकर्त्यांना जीवन संरक्षण आणि बचत या दोन्हींचा लाभ मिळतो. इतकेच नाही तर एलआयसीच्या गुंतवणूकदारांना ही योजना कधीही रद्द करता येते.
मिळते कर्ज सुविधा
ही योजना देशातील गुंतवणूकदारांना कर्ज सुविधा प्रदान करते. एलआयसी प्लॅन घेतल्यानंतर 3 महिने पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना कर्ज देखील घेता येते.
जाणून घ्या पॉलिसीची खास वैशिष्ट्ये