LIC Policy : लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी सतत अनेक आकर्षक पॉलिसी ऑफर करत असते. मोठ्या संख्येने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी LIC पॉलिसींवर विश्वास ठेवत असतात. परंतु खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना पेन्शनची सुरक्षा मिळत नाही.
त्यामुळे नोकरीच्या सुरुवातीलाच सेवानिवृत्तीचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने LIC ने एक खास योजना आणली आहे. ज्यात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला चांगली पेन्शन मिळेल. कसे ते जाणून घ्या.
या योजनेचे नाव न्यू जीवन शांती योजना असे असून जी अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. ही एक सिंगल प्रीमियम ऑफर असून ज्यात जर गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रचंड उत्पन्न मिळेल, जे सुवर्ण संधीपेक्षा कमी नसेल. यात तुम्हाला पेन्शन म्हणून रक्कम देण्याचे काम मासिक आणि वार्षिक आधारावर करण्यात येते. तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळेल.
लक्षात घ्या महत्त्वाच्या गोष्टी
देशातील सर्वात मोठ्या संस्थांमध्ये गणल्या जाणाऱ्या एलआयसीच्या सर्व योजना अनेकांच्या मनावर राज्य निर्माण करत आहेत. जर तुम्हाला या पॉलिसीमध्ये सामील व्हायचे असेल तर तुमचे वय 30 ते 79 वर्षांच्या दरम्यान असावे लागते. एलआयसी या पॉलिसीमध्ये जोखीम संरक्षण देण्यात येत नाही. तसेच योजनेत मिळणारे फायदे लोकांसाठी वरदान ठरतात.
तर त्याच वेळी, कंपनीने ते खरेदी करण्यासाठी दोन पर्याय दिले आहेत. यात पहिली म्हणजे एकल जीवनासाठी स्थगित वार्षिकी आणि दुसरी संयुक्त जीवनासाठी स्थगित वार्षिकी होय. तसेच तुम्ही इच्छित असाल तर, तुम्ही एकाच योजनेत गुंतवणूक करू शकता. नवीन जीवन शांती ही एक वार्षिकी योजना असून ती खरेदी करण्यासोबतच, तुम्ही त्यात तुमची पेन्शन मर्यादा निश्चित करू शकता.
किती मिळेल पेन्शन?
जीवन शांती योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना योग्य पेन्शन मिळते. तसेच या योजनेनुसार, 55 वर्षे वयाच्या व्यक्तीला हा प्लॅन घेत असताना 11 लाख रुपये जमा करावे लागणार आहेत. या एकरकमी गुंतवणुकीवर, तुम्हाला वार्षिक 1,01,880 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन दिले जाते. तुम्हाला प्रत्येक महिन्याला 8,149 रुपये मिळतील. सहा महिन्यांच्या आधारावर तुम्हाला 49,911 रुपये मिळतील. त्यामुळे आजच या योजनेत गुंतवणूक करा.