LIC Scheme : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही देशातील एक प्रसिद्ध विमा कंपनी आहे. देशातील लाखो आणि करोडो लोकांचा LIC वर विश्वास आहे. LIC सुद्धा लोकांना उत्तम पॉलिसी देत असते. आता जर तुम्हाला पॉलिसी घ्यायची असेल, ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळेल.
अशा परिस्थितीत, LIC ची जीवन उमंग पॉलिसी (LIC Jeevan Umang Policy) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते. यामध्ये जास्त रिटर्न मिळण्यासोबतच आणखी अनेक फायदे मिळतात. या योजनेत तुम्हाला फक्त 1400 रुपये जमा करावे लागतील आणि काही काळानंतर तुमच्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी तयार होईल. यानुसार, तुम्हाला दररोज फक्त 47 रुपये गुंतवावे लागतील. यानंतर तुम्हाला मॅच्युरिटीवर 25 लाख रुपये मिळतील.
उदाहरणार्थ, तुम्ही 26 वर्षांचे असाल आणि तुम्ही 4.5 लाख रुपयांच्या विमा संरक्षणासह जीवन उमग पॉलिसी घेतल्यास, तुम्हाला दरमहा सुमारे 1350 रुपये प्रीमियम भरावा लागेल. त्यानुसार वार्षिक प्रीमियम 15,882 रुपये असेल. हे 30 वर्षात 47,6460 रुपये होईल. आता तुम्ही 30 वर्षे सतत प्रीमियम भरल्यास 31 व्या वर्षापासून तुम्हाला दरवर्षी 36000 रुपये पेन्शन मिळेल. तुम्हाला हे पेन्शन आयुष्यभर मिळत राहील.
एलआयसी जीवन उमंग पॉलिसीचे इतर फायदे
ही पॉलिसी घेतल्यास आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळेल. या पॉलिसीमध्ये मूळ विमा रक्कम 2 लाख रुपये आहे. जर पॉलिसी घेणाऱ्याचा 100 वर्षापूर्वी मृत्यू झाला, तर सर्व पैसे नॉमिनीला दिले जातील आणि नॉमिनी हे पैसे एकत्र किंवा हप्त्याने घेऊ शकतात.
पॉलिसी घेणारा 100 वर्षे किंवा प्रीमियम भरण्याची मुदत संपेपर्यंत जिवंत राहिल्यास, प्रत्येक वर्षी त्याला/तिला मूळ विमा रकमेच्या 8% इतका सर्व्हायव्हल लाभ देखील दिला जातो.