ताज्या बातम्या

LIC Scheme : एलआयसीच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक ! मिळणार ‘इतके’ लाख रुपये जाणून बसेल धक्का

LIC Scheme : जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नाची आणि अभ्यासाची काळजी असेल तर ही बातमी तुमच्या सर्व चिंता दूर करेल. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा तुम्हाला बंपर फायदा मिळणार आहे.

LIC ची नवीन चिल्ड्रेन्स मनी बॅक योजना तुम्हाला कमी गुंतवणुकीत अधिक नफा कमविण्याची संधी देते. एवढेच नाही तर या योजनेत सामील झाल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी इतर अनेक फायदेही मिळतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दररोज किमान 150 रुपये वाचवावे लागतील. योजनेत सामील होण्यासाठी तुम्ही जवळच्या भारतीय आयुर्विमा निगम कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

मुलांसाठी खास

भारतीय आयुर्विमा महामंडळाने खासकरून मुलांसाठी चिल्ड्रन मनी बँक प्लॅन (LIC New Children’s Money Back Plan) लाँच केला आहे. त्यामुळेच या योजनेत सहभागी होण्यासाठी मुलाची वयोमर्यादा शून्य ठेवण्यात आली आहे. म्हणजे नवजात बाळाच्या नावानेही या योजनेत गुंतवणूक सुरू करता येईल. त्याच वेळी, जास्तीत जास्त 12 वर्षांपर्यंतची मुले या योजनेत सहभागी होऊन नफा मिळवू शकतात. मनी बँक योजनेत सामील झाल्यानंतर, मूल 18 ते 22 वर्षांचे झाल्यावर मूळ विमा रकमेच्या 20-20 टक्के रक्कम दिली जाते.

याचाही फायदा होईल

नवीन चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन फंडाव्यतिरिक्त, पॉलिसी धारकाला इतर अनेक फायदे देखील प्रदान करते. उदाहरणार्थ, सब्सक्राइबरच्या मृत्यूनंतर, विमा रकमेव्यतिरिक्त, नॉमिनीला विमा देखील दिला जातो. यासह, मृत्यू लाभ प्रीमियम पेमेंटच्या 100% पेक्षा कमी नसल्याची हमी देखील दिली जाते. तुम्हाला पॉलिसी घ्यायची असल्यास, तुम्ही जवळच्या एलआयसी कार्यालयात जाऊन अधिक माहिती गोळा करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही संबंधित एजंटच्या माध्यमातून या योजनेत सहभागी होऊ शकता.

हे पण वाचा :-   Maruti Suzuki : ग्राहकांना धक्का ! ‘त्या’ प्रकरणात मारुती सुझुकीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; आता मोजावे लागणार जास्त पैसे

Ahmednagarlive24 Office

Recent Posts