ताज्या बातम्या

LifeHacks : तुम्हीही बनवता का ‘या’ भांड्यांमध्ये अन्न, हे आहेत त्याचे फायदे आणि तोटे

LifeHacks : आज कित्येकजणांच्या स्वयंपाकघरात (Kitchen) स्वयंपाक करण्यासाठी वेगवेगळ्या मशीन (Machine) त्याचबरोबर बाजारातही (Market) वेगवेगळी उपकरणे उपलब्ध आहेत. यामुळे स्वयंपाक जरी लवकर होत असला तरी त्याचा शरीराला फायदा होत नाही.

याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे रोजच्या स्वयंपाकात वापरली जाणारी भांडी. तुम्ही कोणती भांडी वापरता हे खूप महत्वाचे आहे, त्याचे तसे फायदे तोटेही आहेत.

मातीचे भांडे

मातीच्या भांड्यात (Earthen pot) अन्न शिजवल्यावर त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस टिकून राहतात. याशिवाय मातीच्या भांड्यात अन्न शिजवताना त्यातील पीएच व्हॅल्यूही राखली जाते.

एवढेच नाही तर मातीच्या भांड्यात बनवलेले अन्न खाल्ल्याने गॅस आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्याही दूर होतात. याशिवाय मातीच्या भांड्यात अन्न शिजवताना तेलाचा वापरही कमी होतो. यामुळे तुमचे हृदय सुरक्षित राहते.

ॲल्युमिनियमची भांडी

देशात लोक ॲल्युमिनियमची भांडी (Aluminum utensils) मोठ्या प्रमाणावर वापरतात. या भांड्यात अन्न फार लवकर गरम केले जाते. स्वयंपाक करताना ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये आंबट किंवा आम्लयुक्त भाज्या वापरू नका. ॲल्युमिनिअमची भांडी आम्लांशी रासायनिक प्रतिक्रिया देतात.

स्टेनलेस स्टील

स्टेनलेस स्टील धातूचा (Stainless steel) कल वाढत आहे. स्टेनलेस स्टील कार्बन, क्रोमियम आणि निकेलपासून बनलेले आहे. या स्टीलच्या भांड्यात अन्न शिजवताना तुमच्या आरोग्याला कोणतीही हानी होत नाही.

लोखंड

लोखंडाच्या (Iron) भांड्यात अन्न शिजवल्यास तुमच्या अन्नातील लोहाचे प्रमाण आपोआप वाढते. यामुळे तुम्हाला अन्नामध्ये भरपूर पोषण मिळते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts