Lifestyle News : घरातील स्वच्छता (Cleanliness) करण्यासाठी झाडूचा (Broom) वापर केला जातो. झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते, असे मानले जाते.
केवळ झाडू मारण्याच्या पद्धती जाणून घेणे फार महत्वाचे नाही तर नवीन आणि जुन्या झाडूंशी (Old brooms) संबंधित काही गोष्टी जाणून घेणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
कोणी बाहेर पडताच झाडू लावू नका
घरातून कोणी बाहेर पडले तर लगेच झाडू लावू नका. अशी समजूत आहे की जर कोणी घरातून बाहेर पडला असेल आणि झाडू लावला असेल तर घराबाहेर जाणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कामात (Work) यश मिळत नाही. विशेषत: घरातील प्रमुख सदस्य बाहेर पडल्यास तो बाहेर पडताच झाडू लावू नका.
जुना झाडू कसा काढायचा
जुना झाडू बदलायचा असेल आणि जुना झाडू फेकायचा असेल तर त्यासाठीही नियम आहे. जुना झाडू शनिवारी अमावस्या किंवा होळी (Holi) दहनाच्या दिवशी घराबाहेर काढावा.
वास्तूनुसार इतर दिवशी झाडू घराबाहेर काढणे म्हणजे गरिबीला घरचा रस्ता दाखवणे होय. तर या दिवशी झाडू घराबाहेर काढल्याने नकारात्मक ऊर्जाही (Negative energy) घराबाहेर जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते.
तुटलेला झाडू वापरू नका
झाडू तुटत असेल तर लवकर बदलावा, तुटलेल्या झाडूच्या वापरामुळे घराच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.
जुना झाडू कसा ठेवावा
जुना झाडू ठेवण्याचीही एक पद्धत आहे, जुना झाडू नेहमी अश्या जागी ठेवा जिथे कोणाची नजर त्यावर पडणार नाही, कदाचित तुम्हाला हा झाडू दिसणार नाही. जुना झाडू दिसणे चांगले मानले जात नाही. असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मक उर्जेचा प्रवेश होतो.
झाडू खरेदी करण्याची योग्य वेळ
झाडू खरेदी करण्यासाठी योग्य वेळ जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे. झाडू नेहमी कृष्ण पक्षात येणार्या शुक्रवारी विकत घ्यावा, दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारपासून नवीन झाडू वापरावा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी वाढते.