ताज्या बातम्या

विजेचा लंपडाव ! केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंसोबत अनेक मंत्री थकील वीज बिल यादीत, कारवाई होणार?

मुंबई : राज्यावर सध्या विजेचे मोठे संकट उभे राहिले आहे. अशातच वीज बिल थकबाकीबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून अनेक मंत्री व आमदार यांची यामध्ये नवे समोर आलेली आहेत.

यामध्ये यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्यापासून ते संभाजी छत्रपतींपर्यंतच्या (Sambhaji Chhatrapati) खासदारांनी वीज बिल थकवले आहे.

तर वीज बिल (Electricity bill) थकवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. नियम सर्वांसाठी समान आहेत, असा इशारा राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिला आहे. त्यामुळे वीज बिल (Electricity) थकविणाऱ्या या मंत्र्यांवर कधीपासून कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ऊर्जा विभागाने वीज थकबाकीदारंची यादी जाहीर केली आहे. ३० एप्रिल २०२२ पर्यंतची ही यादी आहे. राज्यातील आमदार, खासदारांसह मंत्री आदी 372 ग्राहकांची 1 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समजते आहे.

तसेच राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांचे वीज बिल थकलं तर लगेच त्यांची वीज कापली जाते. मात्र, आता आमदार, मंत्रीच वीज थकवत असल्याने त्यांच्यावर काय कारवाई कधी कारवाई होणार? याकडे सर्वसामान्य लक्ष देऊन आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts