Maharashtra Lockdown :- राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने खबरदारीसाठी विविध उपाययोजना करण्यात सुरुवात केली आहे. मुंबई-पुण्यात पुन्हा हॉटस्पॉट होण्याची शक्यता असल्याने दोन्ही शहरांसाठी कडक नियमावली समोर येणार आहे
राज्यातील दहा मंत्री व २० आमदारांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळं सरकारची चिंता वाढली असून संसर्ग रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे.
त्यामुळं पुन्हा एकदा लॉकडाउनची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या संदर्भात महत्त्वाचं विधान केलं.राज्यातील काही भागात लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली, तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागात केली जाईल,’ असं उपमुख्यमंत्री म्हणाले.
सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ‘कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागांत केली जाईल,’ असं अजित पवार म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लॉकडाउन केलं आहे. देशातील अनेक राज्यांत रात्रीच्या वेळेस लॉकडाउन करण्यात आलं आहे.
कारण, जेवताना, चहापाण्याच्या वेळेस मास्क काढतो. एकमेकांच्या समोर येतो तेव्हा करोनाचा संसर्ग झपाट्यानं होतो. त्यामुळं या गोष्टी टाळणं नितांत गरजेचं आहे,’ असं अजित पवार म्हणाले.