अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. यासंबंधी राज्य सरकारकडून नवीन नियमावली आज जारी करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. यानंतर आता हे निर्बंध येत्या 1 जूनपर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे परिपत्रक शासनाने जाहीर केले आहे.
राज्यात लॉकडाऊन लावण्याआधी रुग्णांची संख्या सात लाखांपर्यंत पोहचली होती. मात्र लॉकडाउननंतर ही संख्या चार लाख ७५ हजारापर्यंत खाली आली. देशाचा रुग्णवाढीचा दर १.४ आहे, तर राज्यात तो ०.८ पर्यंत आहे.
देशातील ३६ राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा याबाबत ३० वा क्रमांक आहे. त्यामुळे निर्बंधांचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी निर्बंध अधिक वाढवावेत, अशी विनंती केली होती.
अखेर, राज्य सरकारने आज याबाबत निर्णय घेतला असून १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत
ब्रेक द चैन नवी नियमावली