अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पाथर्डी तालुक्यात १० दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
याकाळात फक्त हॉस्पिटल, मेडिकल चालू राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रूट मार्च काढून शक्ती प्रदर्शन केले आहे.
रूट मार्च वेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार शाम वाडकर, नायब तहसिलदार पंकज नेवसे, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे,
उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, गटविकास अधिकारी शितल खिंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे, पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर,
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे,नगरसेवक महेश बोरुडे,नामदेव लबडे, अनिल बोरुडे,रमेश हंडाळ,
बबन बुचकूल यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित झाले होते. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.
यामुळे या काळात प्रत्येक नागरिकांनी घरात राहा सुरक्षित राहा असा संदेश यावेळी प्रशासनाच्या वतीने पाथर्डीकरांना देण्यात आला आहे.
तालुक्यातील कोरोना बधितांची वाढती आकडेवारी लक्षात घेता आज दि 6 में पासून तालुक्यात जनता कर्फ्यू लागू झाला आहे.
शहरात व तालुक्यतील कायदा सुव्यवस्था शांततेत राहावी यासाठी शहरातून प्रशासनाने संचलन करून शक्ती प्रदर्शन केले आहे.