LPG cylinder : येत्या 1 सप्टेंबरपासून असे काही बदल (Change) होणार आहेत ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हे बदल माहित असणे गरजेचे आहे.
या बदलांमध्ये एलपीजी सिलिंडरपासून ते विमा पॉलिसीचा (Insurance policy) समावेश आहे. त्यामुळे तुमच्या महिन्याचे बजेट (Monthly budget) कोलमडू शकते.
एलपीजी सिलेंडरची किंमत
पेट्रोलियम कंपन्या (Petroleum companies) दर महिन्याला एलपीजी सिलिंडरच्या किमती (LPG cylinder prices) ठरवतात. अशा परिस्थितीत येत्या महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल दिसू शकतो.
ऑगस्टच्या पहिल्या तारखेला 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinders) किमतीत कपात करण्यात आली होती. मात्र, या कालावधीत 14 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
टोल टॅक्स महाग होईल
नोएडा ते आग्रा जोडणाऱ्या यमुना एक्स्प्रेस वेवरचा प्रवास 1 सप्टेंबरपासून महाग होणार आहे. खरे तर 1 सप्टेंबरपासून यमुना एक्स्प्रेस वेवरील टोल टॅक्समध्ये (Toll tax) वाढ प्रभावी होणार आहे.
ग्रेटर नोएडा ते आग्रा असा प्रवास करणाऱ्या कार चालकांना आता अतिरिक्त 16.50 रुपये टोल टॅक्स भरावा लागणार आहे. दुसरीकडे बस-ट्रकसाठी 90.75 रुपये आणि मोठ्या व्यावसायिक वाहनांना 173.25 रुपये वाढीव टोल भरावा लागणार आहे.
विमा पॉलिसी प्रीमियम स्वस्त होईल
1 सप्टेंबरपासून विमा पॉलिसीचा प्रीमियम कमी होणार आहे. IRDAI ने बनवलेल्या सामान्य विम्याच्या नियमात बदल केल्यानंतर ग्राहकांना आता एजंटला 30 ते 35 टक्क्यांऐवजी फक्त 20 टक्के कमिशन द्यावे लागणार आहे. त्यामुळे लोकांचा प्रीमियम कमी होईल.
पीएम किसान ई-केवायसी
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसानचा 12 वा हप्ता सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. पण त्याचा लाभ फक्त त्या लोकांनाच मिळेल ज्यांनी या योजनेत ई-केवायसी करून घेतले आहे.
31 ऑगस्ट ही पीएम किसान योजनेतील ई-केवायसीची शेवटची तारीख आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ते पूर्ण केले नाही त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी करणे आवश्यक आहे.