LPG Cylinder : देशात महागाईचा (inflation) पारा हळूहळू वाढतच चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. सर्वसामान्यांना जास्तीचा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. त्यातच घरगुती वापरायच्या गॅसच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर (Gas cylinder) बाबत नवा नियम (new rule) जाहीर केला आहे.
LPG गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने (Central Goverment) एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठा बदल केला आहे. सरकारने एलपीडीचे रेशनिंग सुरू केले आहे.
याअंतर्गत आता एलपीजी सिलिंडरचे ग्राहक वर्षभरात केवळ 15 सिलिंडर घेऊ शकणार आहेत. यासोबतच महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. अशा प्रकारे, एका ग्राहकाला एका महिन्यात 2 पेक्षा जास्त सिलिंडर मिळणार नाहीत.
या 15 एलपीजी गॅस सिलिंडरपैकी 12 गॅस सिलिंडर अनुदानित आणि 3 विनाअनुदानित असतील. आतापर्यंत सिलिंडर मिळविण्यासाठी महिना किंवा वर्षाचा कोटा निश्चित नव्हता. यासाठी गॅस सिलिंडर बुकिंगचे सॉफ्टवेअर बदलले आहे. म्हणजेच आता नवीन प्रणालीनुसारच गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत.
असे सांगण्यात येत आहे की सरकारने तक्रारींच्या आधारे हे पाऊल उचलले आहे, त्यानुसार घरगुती विनाअनुदानित रिफिल वापरल्या जात होत्या कारण ते व्यावसायिकांपेक्षा स्वस्त होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लहान गॅस सिलिंडरच्या रिफिलमध्ये घरगुती विनाअनुदानाचा वापर वाढला असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडर खूप महाग आहेत, त्यामुळे लोक घरगुती गॅस सिलिंडर वापरत आहेत. ही त्रुटी टाळण्यासाठी नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.