ताज्या बातम्या

LPG Cylinder Price Hike : सर्वसामान्य जनतेला आणखी एक फटका, घरगुती LPG सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ

LPG Cylinder Price Hike : देशात महागाई (Inflation) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये भाज्यापासून तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती वाढत (Prices Hike) असून अशातच पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईची झळ बसणार आहे.

घरगुती LPG सिलेंडरच्या (Domestic LPG Cylinder Price) दरात तब्ब्ल 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक ताण आला आहे. 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ केली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात

त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial Gas Cylinders) किमतीत 8.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. 1 जुलै रोजी दिल्लीत (Delhi) व्यावसायिक गॅस सिलिंडर 2021 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला.

आता आज 8.50 रुपयांच्या कपातीनंतर ते 2012.50 रुपये झाले आहे. याआधी मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती 7 तारखेला पहिल्यांदा 50 रुपयांनी वाढल्या होत्या. यानंतर 19 मे रोजीही घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.

जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर आहेत

घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत कोलकातामध्ये 1079 रुपये, मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1052.50 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 1068.50 रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात घरगुती सिलिंडरची किंमत 809 रुपयांवरून 1053 रुपयांवर पोहोचली आहे.

किंमती कशा ठरवल्या जातात

एलपीजी सिलिंडरची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International markets) एलपीजीची किंमत किती आहे, आयात करताना किती ट्रॅफिक चार्जेस येत आहेत इत्यादी अनेक गोष्टींचा अंदाज घेतल्यानंतर किंमत ठरवली जाते.

एलपीजी सिलिंडरवर 5% जीएसटी आकारला जातो. त्यापैकी 2.5% केंद्र सरकारकडे आणि 2.5% राज्य सरकारकडे जाते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts