ताज्या बातम्या

LPG Cylinder Price October 2022 : दिलासादायक! महिन्याच्या पहिल्याच दिवशी स्वस्त झाले एलपीजी सिलिंडर, जाणून घ्या नवीनतम दर

LPG Cylinder Price October 2022 : महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. कारण तेल कंपन्यांनी (Oil companies) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinders) किमतीत कपात केली आहे.

मात्र घरगुती सिलिंडरच्या (Domestic cylinders) दरात कोणताही बदल केला नाही. घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. महिन्याच्या पहिल्या दिवशी हे दर (LPG Cylinder Price) ठरवले जातात.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आजपासून दिल्लीत 25.5 रुपये, मुंबईत 32.5 रुपये, कोलकात्यात 36.5 रुपये, चेन्नईमध्ये 35.5 रुपयांनी कमी केली आहे.

महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ही आहे

या कपातीनंतर दिल्लीत (Delhi) इंडेनचा 19 किलोचा सिलेंडर आता 1885 रुपयांऐवजी 1859.5 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 1844 ऐवजी 1811.5 रुपयांना मिळणार आहे.

तर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर 1995.50 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी 1959 मध्ये रुपयांना मिळत होता. दुसरीकडे, एलपीजी सिलिंडर चेन्नईमध्ये 2009.50 रुपयांना मिळेल. यापूर्वी हा सिलिंडर 2045 रुपयांना मिळत होता.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किंमत निश्चित केली जाते

देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरची (LPG Cylinder) किंमत निश्चित करतात. व्यावसायिक एलपीजी गॅस बहुतेक हॉटेल्स, खाद्यपदार्थांची दुकाने इत्यादींमध्ये वापरला जातो. त्यामुळे त्यांना किमतीतील कपातीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. सलग पाचव्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किमती कमी झाल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts