LPG Gas Cylinder Price Hike : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा (Inflation) चांगलाच फटका बसला आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात
त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial gas cylinder) किमतीत 8.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. 1 जुलै रोजी दिल्लीत (Delhi) व्यावसायिक गॅस सिलिंडर 2021 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला. आता आज 8.50 रुपयांच्या कपातीनंतर ते 2012.50 रुपये झाले आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीला 7 तारखेला पहिल्यांदा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (Household LPG cylinder) किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर 19 मे रोजीही घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.
जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर आहेत
कोलकात्यात (Kolkata) घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1079 रुपये, मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1052.50 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 1068.50 रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात घरगुती सिलिंडरची किंमत 809 रुपयांवरून 1053 रुपयांवर पोहोचली आहे.
किंमती कशा ठरवल्या जातात
एलपीजी सिलिंडरची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एलपीजीची किंमत किती आहे, आयात करताना किती ट्रॅफिक चार्जेस येत आहेत इत्यादी अनेक गोष्टींचा अंदाज घेतल्यानंतर किंमत ठरवली जाते. एलपीजी सिलिंडरवर ५% जीएसटी आकारला जातो. त्यापैकी 2.5% केंद्र सरकारकडे आणि 2.5% राज्य सरकारकडे जाते.