ताज्या बातम्या

Maharashtra Floor Test Live : अखेर सुप्रीम कोर्टाने सांगितलं उद्या काय होणार ?

Maharashtra Floor Test Live : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य ठरवणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आताच झाला आहे. राज्यपालांनी उद्या बहुमतचाचणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले होते आणि त्याला ठाकरे सरकारने आव्हान दिले होते. त्यावर सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजुंनी युक्तिवाद झाला.(Maharashtra political crisis LIVE updates)

CM Uddhav Thackeray resign | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा !

बहुमत चाचणी होणारच – बहुमत चाचणीवर स्थगिती नाही

ठाकरे सरकारला मोठा धक्का, स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; उद्याच होणार बहुमत चाचणी!

शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर जवळपास चार तास युक्तीवाद झाला. अखेर चार तास चालेल्या जोरदार युक्तीवादानंंतर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला.

बहुमत चाचणी पुढे ढकलावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत होती. एकतर फ्लोअर टेस्ट आठवडाभरासाठी पुढे ढकलणे किंवा इतर बाबीवर सुनावणी लवकर घेणे, हाच समतोल साधण्याचा एकमेव मार्ग आहे असा युक्तिवाद शिवसेनेने मांडला.

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सुप्रीम कोर्टाने अर्धातास निकाल राखून ठेवत रात्री ९ वाजता निकाल देणार असल्याचं सांगितले. त्यानंतर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद’ मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळातील अखेरचं भाषण

राज्यात सत्तानाट्याला वेग आला आहे. यातच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहिले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाषण केलं. मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद असं सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. तसंच मला माझ्याच काही लोकांनी दगा दिल्याने ही परिस्थिती उद्धभवल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.

जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला सामोरं जाऊ, या अडीच वर्षात तुम्ही सहकार्य केलं, जर माझ्याकडून कोणाचा अपमान झाला असले कोणी दुखावले असतील तर मी माफी मागतो, असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.

गेल्या अडीच वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगलं सहकार्य केलं, पण मला माझ्याच पक्षातील लोकांनी दगा दिला, याचं दु:ख वाटतं अशी भावना मुख्यमंत्र्यानी यावेळी बोलून दाखवली. उद्या विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यानी राजीनाम्याचा सूतोवाच केल्याचं आता बोललं जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts