अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Maharashtra news :- मार्च महिन्याचे शेवटचे दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट घेऊन आले. आता एप्रिल महिन्यात काय स्थिती असेल, याची उत्सुकता असतानाच भारतीय हवामान विभागाने एप्रिल महिन्यातील हवामानाचा अंदाज वर्तविला आहे.
महाराष्ट्रत एप्रिल महिन्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. म्हणजे एप्रिल महिनाही तप्तच जाणार आहे.
जवळपास संपूर्ण राज्यात नेहमीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे. अर्थात या काळात अनेक भागात अवकाळी पावसाचीही शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज आहे. याववर्षीच्या उन्हाळ्यात प्रशांत महासागरात ला निना कायम राहाणार आहे.
तर हिंदी महासागरात न्यूट्रल स्थितीत असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.