राज्यातून परतीचा पाऊस गेल्यानंतर कोकण-गोवा वगळता उर्वरित राज्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे हवामान कोरडे आहे. पुढील दोन दिवसांत ‘कोकण-गोव्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बुधवारी अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी १७.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली आहे.
ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवायला लागली आहे. ३० अंशांच्या खाली असलेले कमाल तापमान आता ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
त्यामुळे झपाट्याने तापमान वाढत असल्याने उकाडा आणि उन्हाच्या चटक्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. परंतु किमान तापमानात राज्यात गेल्या आठ दिवसांपासून मात्र किंचित घट झाली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांत वातावरणात मोठा बदल झाला आहे. दिवसा कडक ऊन, तर रात्री आणि पहाटे थंडी जाणवत आहे. कमाल तापमानात फारशी वाढ झाली नाही. मात्र तरीही बुधवारी दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण झाले होते .