अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशासनावरील पकड, प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची हातोटी तसेच विकासकामांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा शुभारंभ आमदार लंके यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लंके यांच्या वतीने वंचित घटकांना ५ लाख ४ हजार रुपये किंमतीचे, व्यवसायासाठी उपयुक्त साहित्य वितरित करण्यात आले.
पाच दिव्यांग व्यक्तींना औषधोपचारासाठी प्रत्येकी २० हजार रुपयांची मदत करण्यात आली. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, आत्मा समितीचे अध्यक्ष राहुल झावरे, डॉ. बाळासाहेब कावरे, अण्णा बढे, राजेंद्र चौधरी, ठकाराम लंके, बापू शिर्के, कारभारी पोटघन, बाळासाहेब लंके, संजय मते,
विनायक शेळके, फिरोज हवालदार, दीपक येणारे, प्रकाश गुंड, विजय औटी, संभाजी वाळुंज, प्रकाश गाजरे, संदीप ठाणगे, विश्वास शेटे, माऊली वरखडे, मंगेश लंके, सचिन काळे, भाऊसाहेब भोगाडे, वसंत ढवण, पुनम मुंगसे, दीपाली औटी, कविता औटी, पाकिजा शेख आदी उपस्थित होते. आमदार लंके म्हणाले,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या हिताचे निर्णय घेत आहेत. दुष्काळी पारनेर तालुक्याच्या शेतीच्या सिंचनाचा,
पिण्याच्या पाण्याचा तसेच अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी पवार आग्रही आहेत. गेल्या दोन अर्थसंकल्पात त्यांनी पारनेर तालुक्यासाठी विशेष निधीची तरतूद करून तालुकावासीयांना न्याय दिला.