ताज्या बातम्या

Maharashtra Rain : पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस…

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. त्यामुळे काही ठिकाणच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर काही ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

पुणे (Pune) शहर आणि लगतच्या परिसरात पावसाचा जोर कायम आहे. पुढील आठवड्यापर्यंत हे चित्र कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने (weather Department) व्यक्त केली आहे. पुणे जिल्ह्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस घाट परिसरात येलो अलर्ट (Yellow Alert) जाहीर करण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळपासून शहरासह उपनगरात जोरदार वारे वाहत होते, तर दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. शहरात 1 मिमी तर लोहगाव येथे 0.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे शहरातील काही पाण्याखाली गेले आहेत.

ढगाळ वातावरण राहील

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, १८ ऑगस्टपर्यंत पुणे आणि लगतच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या पावसाची शक्यता आहे, परंतु घाटीच्या शिखरावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

आज आणि उद्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासोबतच 15 आणि 16 ऑगस्ट रोजी गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे.

गुजरात, कोकण आणि गोव्यातही आज पावसाची शक्यता आहे. नवीन हवामान प्रणाली तयार झाल्यामुळे ओडिशा, झारखंड आणि बंगालच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशामध्ये नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts