अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- महाविकास आघाडी सरकार खंडणी गोळा करण्यासाठी पोलीस दलाचा गैरवापर करत आहे, असा आरोप माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केला आहे.
अकोलेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिचड यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी पिचड बोलत होते.
महिलांची असुरक्षितता, निष्पाप साधु-संतांची हत्या, शेतकऱ्यांकडून वीजबिलाची पठाणी वसुली, वीज कनेक्शन तोडणी, भ्रष्ट मंर्त्यांना पाठिशी घालणे,
याबरोबरच सरकारी कारभाराचा निषेध करण्यासाठी व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, गटनेते जालिंदर वाकचौरे, ॲड. वसंतराव मनकर, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, सरचिटणीस यशवंतराव आभाळे, मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख,
अरुण शेळके, बाळासाहेब वडजे, परशूराम शेळके, राज गवांदे, अमोल गोडसे, शंभू नेहे, नरेंद्र नवले, विजय पवार, सुशांत वाकचौरे, सचिन शेटे,
संदीप दातखिळे, मच्छिंद्र चौधरी, संदीप दातखिळे, संतोष तिकांडे, कैलास पुंडे, अमोल येवले, महेश काळे, प्रतिक वाकचौरे, सचिन गवारी उपस्थित होते.