Mahindra Car : भारतीय बाजारात महिंद्राच्या कारचा दबदबा असतो. कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी कंपनी सतत नवनवीन कार लाँच करत असते. सर्वच कारमध्ये कंपनी शानदार फीचर्स आणि मायलेज देत असते.
अशातच कंपनीने काही दिवसांपूर्वी बोलेरो ही कार लाँच केली होती. आता हीच कार खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. या कारला देशभरात खूप लोकप्रियता मिळाली आहे. इतकेच नाही तर कंपनीकडून यात उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहे.
पहा विक्री अहवाल
महिंद्राने आतापर्यंत सर्वात मोठी विक्री नोंदवली असून कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 1 लाखांपेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीने ही कार 2000 साली बाजारात आणली असून तेव्हापासून या कारचे 14 लाखांपेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली आहे.
इतकेच नाही तर 2021 च्या मध्यात लाँच झालेल्या बोलेरो निओने त्याची विक्री सुधारण्यातही खूप मदत झाली आहे. निओ मॉडेलचा ग्राहकवर्ग तरुण असून आता बोलेरो ही कंपनीची सर्वात जास्त विक्री होणारी एसयूव्ही बनली आहे.
जाणून घ्या पॉवरट्रेन
कंपनीकडून या कारमध्ये दमदार इंजिन देण्यात आले आहे. यात 76 HP, 1.5-लिटर, तीन-सिलेंडर mHawk डिझेल इंजिन असून तसेच तुम्हाला यात शानदार फीचर्स मिळतील.
जाणून घ्या किंमत
किमतीबाबत विचार केला तर कंपनीने या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 9.92 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 11.03 लाख रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे जर तुम्हालाही शानदार कार घ्यायची असल्यास कंपनीची ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल.