Mahindra Thar : महिंद्राच्या अनेक कार भारतीय बाजारात धुमाकूळ घालत असतात. कंपनी आपल्या सर्वच कारमध्ये एकापेक्षा एक असे जबरदस्त फीचर्स देत असते. त्यामुळेच या कंपनीच्या कार्सना चांगली मागणी असते. इतकेच नाही तर कंपनीच्या कार्सची किंमतही खूप कमी असते.
त्यामुळे कंपनी इतर कंपन्यांना टक्कर देत असते. अशातच काही दिवसांपुर्वी कंपनीने महिंद्रा थार ही कार लाँच केली आहे. लाँच केल्यापासून कंपनीची ही कार कारप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तुम्ही आता ही कार खूप स्वस्तात खरेदी करू शकता.
महिंद्रा थार इंजिन
महिंद्राच्या या कारमध्ये 2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन (150PS/320Nm) आणि 2.2-लीटर डिझेल इंजिन (130PS/300Nm) आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन (118PS/300Nm) देण्यात आलेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीने नवीन व्हेरियंट सादर केल्यापासून या महिंद्र थारच्या मागणी कमालीची वाढ झाली आहे.
काय आहे फायनान्स प्लॅन?
जर तुम्ही कारच्या बेस व्हेरिएंट (AXO डिझेल RWD) खरेदी करायला गेलात तर तुम्हाला रोडवर 11.38 लाख रुपये खर्च येऊ शकतो. आता आपण असे गृहीत धरू की तुम्ही ही कार कर्जावर खरेदी करत आहात. तुम्हाला आता तुमच्या आवडीनुसार अधिक डाउन पेमेंट देता येत आहे, इतकेच नाही तर वेगवेगळ्या बँकांमध्ये व्याजदर वेगवेगळा असतो तसेच या कर्जाचा कालावधी 1 ते 7 वर्षे निवडता येतो.
उदाहरणार्थ, 5 लाख रुपयांचे डाउन पेमेंट, 10 टक्के व्याजदर आणि कर्जाची मुदत 5 वर्षे गृहीत धरू. आता तुम्हाला प्रत्येक महिन्याला 13,565 रुपये EMI भरावा लागणार आहे. एकूण कर्जाच्या रकमेसाठी आता तुम्हाला यासाठी अतिरिक्त 1.75 लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
किती आहे किंमत?
कंपनीकडून या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 9.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्याच वेळी, त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 16.49 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.