ताज्या बातम्या

Mahindra Discount Offers : महिंद्राच्या ‘या’ लोकप्रिय कारवर मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर, जाणून घ्या किंमत

Mahindra Discount Offers : जर तुम्ही नवीन एसयूव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. अनेक कंपन्यांच्या कारवर नवीन वर्षाच्या सुरुवातील जबरदस्त डिस्काऊंट देण्यात येते. परंतु, भारतातील दिग्ग्ज कार उत्पादक कंपनी महिंद्राच्या एसयूव्हीवर मोठी सवलत दिली जात आहे.

तुम्ही आता Mahindra XUV300, महिंद्रा बोलेरो आणि महिंद्रा मराझो स्वस्तात खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशी भन्नाट ऑफर फक्त काही दिवस आहे. त्यामुळे स्वस्तात शानदार फीचर्स असणारी कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका.

1. महिंद्रा XUV300

महिंद्राच्या सब कॉम्पॅक्ट SUV XUV300 वर 36,500 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. कंपनीच्या या कारची किंमत रु. 8.41 लाख पासून सुरू होते आणि रु. 14.07 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. या कारची विक्री तीन इंजिन पर्यायांसह विक्री केली जात आहे. – 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल (110PS आणि 200Nm), 1.5-लीटर डिझेल इंजिन (117PS आणि 300Nm) आणि 1.2-लीटर TGDI टर्बो-पेट्रोल इंजिन (130PS आणि 230Nm).

2. महिंद्रा बोलेरो

सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारपैकी महिंद्रा बोलेरो ही एक आहे. या महिन्यात कार 70 हजार रुपयांपर्यंत सूट देऊन खरेदी करता येणार आहे. या बोलेरोमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे जे 75 Bhp कमाल पॉवर आणि 210 Nm पीक टॉर्क निर्माण करते. तर यामध्ये पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. सध्या, या कारची किंमत 9.53 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 10.48 लाख रुपयांपर्यंत जाते.

3. महिंद्रा मराझो

महिंद्रा मराझो ही कंपनीची एकमेव एमपीव्ही कार असून आता या कारवर 37,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. या कारची किंमत रु. 13.41 लाख पासून सुरू होते आणि रु. 15.70 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. यात 1.5-लिटर डिझेल इंजिन (122PS आणि 300Nm) देण्यात असून ते इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts