अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news :- कांद्याचे पीक हे नाशवंत असल्यामुळे काही शेतकरी बाजारभाव नसताना देखील त्याला तो विकावा लागतो.त्याला घोडेगावच्या माऊलीनी पर्याय काढला आहे.
यासाठी त्याने शेतकऱ्यांच्या गाठीभेटी आणि केव्हीके कृषी संस्थेचा अभ्यास करून आता कांदा काढणीनंतरही कांदा टिकून राहील अशा बियाणांचा त्यांनी शोध घेतला.
केव्हीके येथील ‘भीमा शक्ती’चे बियाणेच उत्पादन वाढीचा भविष्यात ‘टर्निंगपॉइंट’ ठरणार आहे. तर हा कांदा आता 8 ते 9 महिने कांदा साठवता येणार आहे.
आता सध्या काही शेतकऱ्यांकडे साठवून क्षमता असली तरी कांदा जास्त दिवस साठवून ठेवता येत नसल्याने त्यांना अनेकदा बाजारभाव नसताना देखील त्यांना तो विकावा लागतो.
कांदा काढणीनंतर 2 ते 3 महिने टिकून राहतो, नंतर मात्र तो खराब होतो. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक नुकसान होते. भीमा शक्ती’च्या बियाणामुळे उत्पादन तर चांगले निघणारच आहे.
पण कांदा जास्तीत जास्त दिवस साठवता येऊन भाव आल्यानंतरच तो काढता येणार आहे. त्यामुळे त्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्याला होणार आहे.