Maharashtra News : महाराष्ट्रात गेल्यावर्षीच्या सुरवातीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेला डेल्टा व्हेरियंट आता राज्यातून नामशेष होत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या या उपप्रकाराने सुमारे ९० हजार जणांचे बळी घेतले होते.
पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या संशोधक पथकाने या व्हेरिंटचा शोध लावला होता. बी. जे.च्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले की,
नव्याने उदयास येत असलेल्या ओमिक्रॉनच्याच ‘बीए.2.75’ या व्हेरियंटमुळे ‘बीए.5’ राज्यातून डेल्टा हद्दपार होत असल्याचे निरीक्षण बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातर्फे नोंदवण्यात आले आहे.
गेल्या नऊ दिवसात राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये, बी.ए. ४ आणि ५ चे नवे ७३ तर बी.ए. २.७५ चे नवे २०९ असे एकूण २८२ रुग्ण आढळले आहेत. राज्यात १० ते १९ ऑगस्ट या कालावधीतील प्रयोगशाळांच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.